Showing posts with label सर सुखाची श्रावणी. Show all posts
Showing posts with label सर सुखाची श्रावणी. Show all posts

Monday, November 18, 2013

सर सुखाची श्रावणी

गायक - अभिजीत सावंत,बेला शेंडे 
संगीत - निलेश मोहरीर
गीत - गुरु ठाकुर 
चित्रपट - मंगलाष्टक वन्स मोर (२०१३)

थांब ना... तू कळू दे...थांब ना..

गुणगुणावे गीत वाटे.. शब्द मिळू दे..थांब ना 
हूल कि.. चाहूल तू इतके कळू दे..थांब ना 
गुंतलेला श्वास हा... सोडवू दे थांब ना 
तोल माझा सावरू दे.. थांब ना 

सर सुखाची श्रावणी की.. नाचरा वळीव हा 
गुंतण्याआतुर फिरुनी.. आज वेडा जीव हा 

सापडाया लागले मी.. ज्या क्षणी माझी मला 
नेमका वळणावरी.. त्या जीव हा भांबावला 
खेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा 
कालचा हा खेळ बघ वाटे नवा 

बावऱ्या माझ्या मनाचे.. उलगडेना वागणे 
उसवणे होते खरे की.. हे नव्याने गुंतणे 
वाटतो आता.. उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा 
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा
 
गुणगुणावे गीत वाटे.. शब्द मिळू दे..थांब ना 
हूल कि.. चाहूल तू इतके कळू दे..थांब ना 
गुंतलेला श्वास हा... सोडवू दे थांब ना 
तोल माझा सावरू दे.. थांब ना 

Online Link