Monday, November 18, 2013

सर सुखाची श्रावणी

गायक - अभिजीत सावंत,बेला शेंडे 
संगीत - निलेश मोहरीर
गीत - गुरु ठाकुर 
चित्रपट - मंगलाष्टक वन्स मोर (२०१३)

थांब ना... तू कळू दे...थांब ना..

गुणगुणावे गीत वाटे.. शब्द मिळू दे..थांब ना 
हूल कि.. चाहूल तू इतके कळू दे..थांब ना 
गुंतलेला श्वास हा... सोडवू दे थांब ना 
तोल माझा सावरू दे.. थांब ना 

सर सुखाची श्रावणी की.. नाचरा वळीव हा 
गुंतण्याआतुर फिरुनी.. आज वेडा जीव हा 

सापडाया लागले मी.. ज्या क्षणी माझी मला 
नेमका वळणावरी.. त्या जीव हा भांबावला 
खेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा 
कालचा हा खेळ बघ वाटे नवा 

बावऱ्या माझ्या मनाचे.. उलगडेना वागणे 
उसवणे होते खरे की.. हे नव्याने गुंतणे 
वाटतो आता.. उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा 
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा
 
गुणगुणावे गीत वाटे.. शब्द मिळू दे..थांब ना 
हूल कि.. चाहूल तू इतके कळू दे..थांब ना 
गुंतलेला श्वास हा... सोडवू दे थांब ना 
तोल माझा सावरू दे.. थांब ना 

Online Link


Monday, February 20, 2012

मन रानात गेलं ग

गायिका - श्रेया घोषाल
संगीत -  अजय-अतुल
गीत - संजय पाटील
चित्रपट - जोगवा (२००९)


मन रानात गेलं ग... पाना-पानात गेलं ग..
मन रानात गेलं ग... पाना-पानात गेलं ग..
मन चिंचेच्या झाडात... आंब्याच्या पाडात गेलं ग... -- २

हे.. बिल्लोरी खिल्लोरी.. सांज सांज पाहू ग...झिम्माड वारा होऊ ग...
हे... लबाड ह्या ताऱ्याला... थांब थांब सांगू ग....चांदाला हात लाऊ ग....
हे...फिरफिरल्यावानी... ही धरती फुला रं ...कळीला जाग आली ग...
हे...थरथरल्यावानी... हे नाचं शिवार...कळीचं फुल झाल ग...
हे...भानात रानात....हे...धुंद धुंद झालं मन... रानात गेलं ग....

मन रानात गेलं ग... पाना-पानात गेलं ग..
मन रानात गेलं ग... पाना-पानात गेलं ग..
मन चिंचेच्या झाडात... आंब्याच्या पाडात... गेलं ग..

हे... सऱ्रराट ह्या आभाळी...  उंच उंच  जाऊ  ग.. वाऱ्याचा पंख होऊ  ग..
हे... थऱ्रराट पान्यामंधी.... चिंब चिंब  न्हाऊ  ग... ढगाचा झोका  होऊ  ग.. .
हे...शिऱ्रशिरल्यावानी... ही झाड चुकार.. पानाची साद  देती  ग..
हे...सऱ्रसरल्यावानी... ही माती हुंकार... रंगाचा नाद होई  ग..
हे...भानात रानात...  हे...धुंद धुंद झालं मन.... रानात गेलं ग....पाना-पानात गेलं ग..

मन रानात गेलं ग...पाना-पानात गेलं ग..
मन चिंचेच्या झाडात... आंब्याच्या पाडात गेलं ग...

हो...मन रानात गेलं ग... पाना-पानात गेलं ग..
मन रानात गेलं ग... पाना-पानात गेलं ग..
मन चिंचेच्या झाडात... आंब्याच्या पाडात गेलं ग...



Man Ranaat Gel ga.

Singer - Shreya Ghoshal
Music -  Ajay-Atul
Lyrics - Sanjay Patil
Movie - Jogwa 2009.

का कळेना - मुंबई पुणे मुंबई....

Ka Kalena - Mumbai Pune Mumbai

का कळेना... कोणत्या क्षणी..हरवते मन कसे...
उमलती कश्या धुंद भावना.. अलगद वाटे कसे...
बंध जुळती हे प्रीतीचे.. गोड नाते हे जन्मांतरीचे...

एक मी.. एक तू.. शब्द मी.. गीत तू...
आकाश तू .. आभास तू.. साऱ्यात तू..
ध्यास मी....श्वास तू.... स्पर्श मी... मोहर तू...
स्वप्नात तू... सत्यात तू... साऱ्यात तू..

का कळेना... कोणत्या क्षणी... हरवते मन कसे...
उमलती कश्या धुंद भावना.. अलगद वाटे कसे...
बंध जुळती हे प्रीतीचे.. गोड नाते हे जन्मांतरीचे...

घडले कसे कधी...कळते न जे कधी...
हळुवार ते... आले कसे ओठावरी ...
दे ना तू साथ दे...हातात हात दे...
नजरेतला...नजरेतुनी....इकरार घे...

का कळेना... कोणत्या क्षणी..हरवते मन कसे...
उमलती कश्या धुंद भावना.. अलगद वाटे कसे...
बंध जुळती हे प्रीतीचे.. गोड नाते हे जन्मांतरीचे...

कधी तू.. -- मुंबई पुणे मुंबई

कधी तू.. रिमझिम झरणारी.. बरसात... कधी तू.. चमचम करणारी.. चांदण्यात...

कधी तू.. कोसळत्या धारा.. थैमान वारा... बिजलीची नक्षी... अंबरात..
सळसळत्या लाटा... भिजलेल्या वाटा... चिंब पावसाची ओली रात...

कधी तू.. रिमझिम झरणारी.. बरसात... कधी तू.. चमचम करणारी.. चांदण्यात...

कधी तू.. अंग अंग मोहरणारी...आसमंत दरवळणारी.. रातराणी वेड्या जंगलात - 2
कधी तू.. हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात... कधी तू.. रिमझिम झरणारी.. बरसात...
कधी तू.. कोसळत्या धारा.. थैमान वारा... बिजलीची नक्षी अंबरात..
सळसळत्या लाटा... भिजलेल्या वाटा... चिंब पावसाची ओली रात...

कधी तू.. रिमझिम झरणारी.. बरसात...कधी तू.. चमचम करणारी.. चांदण्यात...

जरी तू.. कळले तरी ना कळणारे... दिसले तरी.. ना दिसणारे... विरणारे मृगजळ एक क्षणात - 2
तरी तू.. मिटलेल्या माझ्या पापण्यात.. कधी तू.. रिमझिम झरणारी.. बरसात...
कधी तू.. कोसळत्या धारा.. थैमान वारा...बिजलीची नक्षी अंबरात..
सळसळत्या लाटा... भिजलेल्या वाटा... चिंब पावसाची ओली रात...

कधी तू.. रिमझिम झरणारी.. बरसात...कधी तू.. चमचम करणारी.. चांदण्यात...

Wednesday, July 20, 2011

निळ्या नभाखाली ( Nilya Nabhakhali ..)

Zee Marathi Bhagyalakshmi Song Lyrics...

This song was featured on 4 Jan 2011 episode.

Following is the lyrics for the song.

निळ्या नभाखाली आज दोन जीव एक
चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख

क्षणांचे ग दिवे होती, रोज तुझ्या संग
ऋतू बघ लाजुनिया, बदलतील रंग


अबोल शब्दांचा, माझ्या अंगी हा शहारा
हात येती हातात, होई तोच ग किनारा
श्वास तुझा गुलाबाचा, भिनला मनात
देह असे चिंब भिजले, कोवळ्या उन्हात


खोल माझ्या अंतरात, बांधले तुझेच घर
तुझ्या प्रेमाची ती हाक, जसा पहाटेचा स्वर
दोन डोळ्यांच्या डोहात, मी असा हरवतो
काजळयांच्या काठावरती, पुन्हा कसा वरतो

Youtube link:

Nilya Nabhakhali - Zee Marathi Bhagyalakshmi